मा. जिल्हाधिकारी महोदय व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)
व्ही. बी. जी राम जी अधिनियम, २०२५ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आज जनजागृती कार्यक्रम व विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुषंगाने मा गट विकास अधिकारी पंचायत समिती खुलताबाद यांच्या आदेशानुसार खुलताबाद तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती स्तरावर जनजागृती व ग्रामसभा यशस्वीरीत्या पार पडल्या. या ग्रामसभांमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना व्ही. बी. जी राम जी अधिनियमाचे महत्त्व, उद्देश व अंमलबजावणीची प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली व योजनेबाबत जनजागृती केली